१६ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, प्रेग्नंट केले!

मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना
 
rape

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १६ वर्षीय मुलीवर २७ वर्षांच्‍या विवाहित तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली. काल, ९ नोव्‍हेंबरला रात्री उशिरा धामणगाव बढे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक रामदास सोळंके (२७, रा. बोराखेडी, ता. मोताळा) असे संशयिताचे नाव आहे.

अशोकची पत्नी बाळंतीण झाल्याने नात्यातीलच एका मुलीला त्‍याने घरकामासाठी एप्रिलमध्ये बोलावले होते. ती बोराखेडी येथे त्‍याच्‍याकडे राहायला आल्यानंतर त्‍याची तिच्यावरच नजर फिरली. एक दिवस अल्पवयीन मुलगी शेजारच्या मुलासोबत बोलत असताना अशोकने बघितले. "तुझे त्‍या मुलासोबत लफडे अाहे. मी तुझ्या घरी सांगतो' असे म्हणून तिला धमकावत त्‍याने तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार केला. त्‍यानंतर वारंवार जबरदस्तीने तिच्‍याशी शरीसंबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. काल ९ नोव्हेंबर रोजी पीडितेने धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष गद्रे करीत आहेत.