…म्‍हणून झाला हिवरखेडचे ठाणेदार प्रवीण तळी, सहायक फौजदार बोबडेंचा एसपींच्या हस्ते गौरव!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोन्याच्या गिन्न्याच्या आमिषाने बोलावून लुटमार करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी पोलीस दलाने खामगाव तालुक्यात नुकतेच विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवले. त्यात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण तळी व सहायक पोलीस उपनिरिक्षक हरीविजय बोबडे यांना नुकतेच कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी गौरवले. मोजक्या पोलीस अधिकाऱ्यांना हा …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सोन्याच्‍या गिन्न्याच्‍या आमिषाने बोलावून लुटमार करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी पोलीस दलाने खामगाव तालुक्‍यात नुकतेच विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवले. त्‍यात उत्‍कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण तळी व सहायक पोलीस उपनिरिक्षक हरीविजय बोबडे यांना नुकतेच कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी गौरवले. मोजक्या पोलीस अधिकाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. अंत्रज, शिर्ला नेमाने परिसरात या लुटारूंच्‍या टोळ्या सक्रिय होत्या. या टोळ्यांना आळा घालणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे पोलीस अधीक्षकांच्‍या नेतृत्त्वात खामगाव पोलीस विभागाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून 25 आरोपींना पकडले होते.