‘शेठ’लोकांवर आता बुलडाण्याच्‍या पोलिसांची करडी नजर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट… म्हणत तलवारीने केक कापण्याचे प्रकार वाढल्याने अशा “शेठ’लोकांवर आता पोलिसांनी करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे. वाढदिवसाचे सेलिब्रेशन हटके करण्याच्या नादात चाकू, तलवारीसारख्या घातक शस्त्रांचा वापर आता थेट गजाआड करू शकतो. यामुळे वाढदिवसाच्या उत्साहाचा अन् आनंदाचा बेरंग होऊ शकतो. सोशल मीडियावर वाढत असलेल्या या गुंडागर्दीवर …
 
‘शेठ’लोकांवर आता बुलडाण्याच्‍या पोलिसांची करडी नजर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट… म्‍हणत तलवारीने केक कापण्याचे प्रकार वाढल्‍याने अशा “शेठ’लोकांवर आता पोलिसांनी करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे. वाढदिवसाचे सेलिब्रेशन हटके करण्याच्‍या नादात चाकू, तलवारीसारख्या घातक शस्‍त्रांचा वापर आता थेट गजाआड करू शकतो. यामुळे वाढदिवसाच्या उत्साहाचा अन्‌ आनंदाचा बेरंग होऊ शकतो. सोशल मीडियावर वाढत असलेल्या या गुंडागर्दीवर २४ तास वॉच असल्याची माहिती जिल्हा सायबर क्राईम ब्रँचने बुलडाणा लाइव्हला दिली आहे.

बॅनर्स लावण्यापेक्षा आता सोशल मीडियावर वाढदिवसाचा मोठेपणा केला जात आहे. अनेकदा मित्रांच्‍या प्रोत्‍साहनातूनही हे प्रकार घडतात. रात्री १२ च्‍या ठोक्‍याला फटाक्यांची आतषबाजी, भरस्त्यात दुचाकी किंवा कार आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला जातो. सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो अपलोड केले जातात. “ओ शेठ तुम्हीच नांदच केलाय थेट यासारखे…, आमचं काळीज, युवा नेते’ असे कॅप्शन त्या फोटो व व्हिडिओला दिले जाते. यातून त्या त्या भागांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याची स्पर्धाच तरुणांमध्ये सध्या सुरू असल्याचे दिसते. यातून वादाचेही प्रसंग जिल्ह्यात घडले आहेत.

नेत्यांनाही नसते भान…
तरुणांमध्ये अशा हटके पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र शस्‍त्र वापरासंबंधीचे ज्ञान असूनही लोकप्रतिनिधी व नेतेही “हवा’ करण्याच्‍या नादात चुकत असल्याचे दिसून आले आहे. प्रदेश किंवा राष्ट्रीय स्तरावरील नेते जिल्ह्यात येतात तेव्हा तलवार देऊन त्यांचे स्वागत केले जाते. हा प्रकारही कायद्याने गुन्‍हाच, मात्र त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याचे ऐकिवात नाही. काही महिन्यांपूर्वी मलकापूरचे उपनगराध्यक्ष हाजी रशीद खाँ जमादार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सुद्धा त्यांचे कार्यकर्ते तलवारी हातात घेऊन नाचले होते. यावर अनेकांनी टीका केली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

लाईक करणारे सुद्धा येऊ शकतात अडचणीत…
सोशल मीडियावर तलवारीने केक कापण्याचे व्हिडिओ, फोटो शेअर करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. सोबतच लाईक, शेअर आणि कंमेंट्स करणाऱ्यांनाही चौकशीला सामोरे जाऊ लागू शकते. लाईक आणि शेअर करून अशा कृत्यांना प्रोत्साहन देणेसुद्धा गुन्हा आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो अपलोड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. रात्री, अपरात्री सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाईल.

बजरंग बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक, बुलडाणा

इशारा ः बुलडाणा लाइव्हवरील बातम्या, फोटो कॉपी करण्यास मनाई असून, असे करताना कुणी आढळल्‍यास सा. भालाफेक आणि लाइव्ह ग्रुपकडून कायदेशीर कारवाई केली जाईल.- संचालक