‘तिला’ नेण्याचा त्‍यांचा प्रयत्‍न फसला…; देऊळगाव राजात खळबळ

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा येथील जालना रोडवरील सान्वी मोटार्स व बालाजी ऑटो पार्ट दुकानासमोर उभी असलेली कार चोरून नेण्याचा प्रयत्न झाला. काल, 28 एप्रिलच्या रात्री घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच ठिकाणी महिनाभरात दुसऱ्यांदा चोरट्यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा येथील जालना रोडवरील सान्वी मोटार्स व बालाजी ऑटो पार्ट दुकानासमोर उभी असलेली कार चोरून नेण्याचा प्रयत्‍न झाला. काल, 28 एप्रिलच्‍या रात्री घडलेला हा प्रकार सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच ठिकाणी महिनाभरात दुसऱ्यांदा चोरट्यांनी आपले अस्‍तित्‍व दाखवून दिले आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. गेल्‍या 7 एप्रिलला सान्वी मोटार्स व बालाजी ऑटो पार्ट शोरूम फोडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलेला आहे. घटनेला काही दिवस उलटत नाही तोच याच शोरूमसमोर उभी कार (MH28 AZ 5777) चोरून नेण्याचा प्रयत्‍न काल रात्री घडला. सुदैवाने चोरट्यांना कार चोरी करता आली नाही. कारमालक रामविजय नरोडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकाँ प्रदीप गुंजकर करीत आहेत.