३२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 32 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगरूळ नवघरे (ता. चिखली) येथे आज, 23 जुलैला सकाळी समोर आली. श्रीकिसन सिताराम येळवंडे असे युवकाचे नाव आहे. घरातील लोक शेतात गेलेले असताना येळवंडे याने घरातील लाकडी बल्लीला गळफास घेतला. ही बाब शेजारी राहणाऱ्या नातेवाइकांच्या लक्षात आली. अमडापूर पोलिसांना याबाबतची माहिती …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 32 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगरूळ नवघरे (ता. चिखली) येथे आज, 23 जुलैला सकाळी समोर आली. श्रीकिसन सिताराम येळवंडे असे युवकाचे नाव आहे.

घरातील लोक शेतात गेलेले असताना येळवंडे याने घरातील लाकडी बल्लीला गळफास घेतला. ही बाब शेजारी राहणाऱ्या नातेवाइकांच्या लक्षात आली. अमडापूर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखलीच्या उपजिल्हा पाठविण्यात आला आहे. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नव्हते.