१७ वर्षीय मुलगा १५ वर्षीय मुलीला “त्‍या’ कामासाठी करत होता ब्लॅकमेल; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक सबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तो स्वतःचे जीवाचे बरे वाईट करून घेईन असे म्हणत ब्लॅकमेल करायचा. मुलीने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली असून, आज, २१ जुलै रोजी बुलडाणा शहरातील व्यंकटेशनगर येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक सबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तो स्वतःचे जीवाचे बरे वाईट करून घेईन असे म्हणत ब्लॅकमेल करायचा. मुलीने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली असून, आज, २१ जुलै रोजी बुलडाणा शहरातील व्यंकटेशनगर येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली रोड भागातील व्यंकटेशनगरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच भागातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधली. त्यानंतर जानेवारी २०२१ ते ७ जुलै २०२१ या कालावधीत त्याने अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. संबंध प्रस्थापित करण्यासाठी तो स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करून घेण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होता, असे अल्पवयीन मुलीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तपास बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील करत आहेत.