१५ वर्षीय मुलीचे खामगावातून अपहरण!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मावशीच्या घरी जाते असे सांगून घराबाहेर पडलेली १५ वर्षीय मुलगी घरी परतलीच नाही. तिला कुणीतरी पळवल्याची भीती तिच्या वडिलांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत व्यक्त केली आहे. खामगाव शहरातील संकट मोचन हनुमानजी मंदिराच्या बाजूला असलेल्या रेल्वे गेटजवळ ही घटना काल, ९ ऑगस्टला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. रंग सावळा, उंची …
 
१५ वर्षीय मुलीचे खामगावातून अपहरण!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मावशीच्या घरी जाते असे सांगून घराबाहेर पडलेली १५ वर्षीय मुलगी घरी परतलीच नाही. तिला कुणीतरी पळवल्याची भीती तिच्‍या वडिलांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत व्‍यक्‍त केली आहे. खामगाव शहरातील संकट मोचन हनुमानजी मंदिराच्‍या बाजूला असलेल्या रेल्‍वे गेटजवळ ही घटना काल, ९ ऑगस्‍टला सकाळी साडेदहाच्‍या सुमारास घडली. रंग सावळा, उंची पाच फूट चार इंच, अंगात फिक्कट गुलाबी टॉप, निळा पलाझो, पांढरा स्टोल, पायात फिक्कट गुलाबी सँडल असे तिचे वर्णन असून, तिच्या वडिलांनी तिचा नातेवाइक व गावात इतरत्र शोध घेतला पण ती मिळून आली नाही. तपास पोलीस उपनिरिक्षक श्रीमती अहिरे करत आहेत.