हद्द झाली… हिवरखेडच्‍या ठाणेदारांच्‍या नावाने उघडले फेसबुक अकाऊंट!; ठाणेदारांनी तातडीने केले मित्रांना अलर्ट!!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण तळी यांच्या नावाने कुणीतरी खोटे फेसबुक अकाउंट उघडल्याचे समोर आले आहे. या खोट्या अकाउंटवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. त्यांच्या मित्रांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने श्री. तळी यांनी खोटे अकाउंट बंद करण्याची विनंती फेसबुककडे केली. आता अकाउंट बंद झाल्याने संभाव्य धोका टळला आहे. …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्‍यातील हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण तळी यांच्या नावाने कुणीतरी खोटे फेसबुक अकाउंट उघडल्याचे समोर आले आहे. या खोट्या अकाउंटवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. त्‍यांच्या मित्रांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने श्री. तळी यांनी खोटे अकाउंट बंद करण्याची विनंती फेसबुककडे केली. आता अकाउंट बंद झाल्‍याने संभाव्य धोका टळला आहे.

ठाणेदार श्री. तळी यांच्‍या फेसबुक प्रोफाइलवरून फोटो डाऊनलोड करून भामट्याने बनावट फेसबुक खाते उघडले होते. बनावट खाते तयार करणे, नंतर फेसबुक मेसेंजरवरून मित्रांना पैशांची विनंती करणे असे प्रकार या माध्यमातून होत असतात. मात्र ठाणेदार तळी यांनी लगेच त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून कुणी पैसे मागत असेल तर पैसे पाठवू नका, असे आवाहन केले. खोट्या अकाउंटची तक्रार फेसबुककडे करून अकाउंट बंद करण्याची विनंती केल्याने खोटे अकाउंट फेसबुकने बंद केले आहे.

प्रोफाइल ठेवा लॉक
फेसबुक प्रोफाइल लॉक नसल्याने कुणीतरी माझे फोटो डाउनलोड करून हा प्रकार केला आहे. त्यामुळे आता फेसबुक प्रोफाइल लॉक केले आहे. फेसबुक वापरकर्त्यांनी सुद्धा आपले फेसबुक प्रोफाइल लॉक ठेवावे. जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत, असे आवाहन ठाणेदार प्रविण तळी यांनी बुलडाणा लाइव्हच्‍या माध्यमातून केले आहे.