सुरजदेवी मोहता महाविद्यालयातून बेपत्ता झालेली तरुणी लग्‍न करूनच परतली!; खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः खामगावच्या सुरजदेवी मोहता महाविद्यालयातून बेपत्ता झालेली २१ वर्षीय तरुणी थेट लग्न करूनच घरी परतली आहे. २२ जुलैला ती बेपत्ता झाली होती. तिच्या मामांनी ती हरवल्याची तक्रार खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिली होती. कॉलेजमध्ये जाते असे सांगून ही तरुणी घरातून बाहेर पडली होती. ती हरवल्याचे वृत्तही बुलडाणा लाइव्हने प्रसिद्ध केले होते. २९ …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः खामगावच्‍या सुरजदेवी मोहता महाविद्यालयातून बेपत्ता झालेली २१ वर्षीय तरुणी थेट लग्‍न करूनच घरी परतली आहे. २२ जुलैला ती बेपत्ता झाली होती. तिच्‍या मामांनी ती हरवल्याची तक्रार खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिली होती. कॉलेजमध्ये जाते असे सांगून ही तरुणी घरातून बाहेर पडली होती. ती हरवल्याचे वृत्तही बुलडाणा लाइव्हने प्रसिद्ध केले होते. २९ जुलैला तिने खामगावच्याच शिवाजीनगर भागातील रहिवासी २६ वर्षीय तरुणासोबत अमरावती येथे लग्न केले. ३० जुलैला सकाळी दहाच्‍या सुमारास हे जोडपे खामगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. दोघेही सज्ञान आणि स्वखुशीने लग्‍न केले असल्याचे त्‍यांनी पोलीस ठाण्यात येऊन सांगितले.