सात वर्षीय चिमुकल्यासह विवाहिता बेपत्ता; दोन महिने वाट पाहून पती पोलीस ठाण्यात

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सात वर्षीय चिमुकल्यासह ३५ वर्षीय विवाहिता घरातून निघून गेल्याची घटना १ जूनला घडली होती. दोन महिने वाट पाहिल्यानंतर, कायद्याचे फारसे ज्ञान नसल्याने दोन महिन्यांनी काल, ३ ऑगस्टला पतीने पिंपळगाव राजा पोलीस ठाणे गाठून पत्नी व मुलगा हरवल्याची तक्रार दिली आहे. सुनिता श्यामराव सतीशे (रा. इवरा, ता. खामगाव) व करण श्यामराव …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सात वर्षीय चिमुकल्यासह ३५ वर्षीय विवाहिता घरातून निघून गेल्याची घटना १ जूनला घडली होती. दोन महिने वाट पाहिल्यानंतर, कायद्याचे फारसे ज्ञान नसल्याने दोन महिन्यांनी काल, ३ ऑगस्‍टला पतीने पिंपळगाव राजा पोलीस ठाणे गाठून पत्‍नी व मुलगा हरवल्याची तक्रार दिली आहे.

सुनिता श्यामराव सतीशे (रा. इवरा, ता. खामगाव) व करण श्यामराव सतीशे अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. टाकळी तलाव येथील माहेरावरून ती मुलासह कुठेतरी निघून गेली आहे. तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र दोघे मिळून आले नाहीत. अखेर पती श्यामराव लाला सतीशे (४०, रा. इवरा ता. खामगाव) याने तक्रार दिली. रंग सावळा निमगोरा, उंची पाच फूट चार इंच, बांधा मजबूत, केस काळे, उजव्या हाताच्या पोटरीवर श्यामराव नाव गोंदलेले, कपडे अंगात पिवळी साडी हिरवे ब्लाऊज, पायात तोरड्या, लाल सँडल असे विवाहितेचे वर्णन आहे. ती कुठे आढळल्‍यास तपास अधिकारी नापोकाँ शेख नवाज यांच्‍याशी मो. नं. 9604441313 वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दोन दिवसांत ६ जण बेपत्ता
गेल्या दोन दिवसांत (३ ते ४ ऑगस्‍ट) जिल्ह्यातून ७ जण बेपत्ता झाल्याच्‍या नोंदी पोलीस ठाण्यांत झाल्या आहेत. हे बेपत्ता असे ः
पवन सुरेश जोशी (३५, राजेश्व कॉलनी, शेगाव, पोलीस ठाणे शेगाव शहर), शेख अजहर शेख अफसर (२३, बालाजी मंदिराजवळ, मेहकर, पोलीस ठाणे मेहकर), मीरा गजानन दळवी (३५, चांडोळ, ता. बुलडाणा, पोलीस ठाणे धाड), अभिषेक गजानन काळे (१९, संभाजीनगर, चिखली, पोलीस ठाणे चिखली), सौ. दुर्गा महादेव बानाईत (३५, जुने महादेव मंदिर नागझरी रोड, शेगाव, पोलीस ठाणे शेगाव शहर), कु. प्रियांका भगवान शिवणकर (२१, विश्वनाथनगर, आडसना रोड, शेगाव, पोलीस ठाणे शेगाव), भानुदास तुकाराम पिसे (६४, कुबेफळ,ता. खामगाव, पोलीस ठाणे पिंपळगाव राजा).