साडेसहा लाखांच्या ट्रॅक्‍टरसह अडीच लाखांचे थ्रेशर गेले चोरी!; लोणार तालुक्‍यातील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेले थ्रेशर चोरीस गेल्याची घटना शारा (ता. लोणार) येथे समोर आली आहे. या प्रकरणी काल, १२ ऑक्टोबरला शेतकऱ्याने लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजू रामदास डव्हळे (३५, रा. शारा) यांनी शेती कामाकरिता विकत घेतलेले ट्रॅक्टर (माॅडेल RX -47 निळे, किंमत ६ …
 
साडेसहा लाखांच्या ट्रॅक्‍टरसह अडीच लाखांचे थ्रेशर गेले चोरी!; लोणार तालुक्‍यातील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रॅक्‍टर आणि त्‍याला जोडलेले थ्रेशर चोरीस गेल्याची घटना शारा (ता. लोणार) येथे समोर आली आहे. या प्रकरणी काल, १२ ऑक्‍टोबरला शेतकऱ्याने लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. राजू रामदास डव्हळे (३५, रा. शारा) यांनी शेती कामाकरिता विकत घेतलेले ट्रॅक्टर (माॅडेल RX -47 निळे, किंमत ६ लाख ६५ हजार रुपये) व त्‍याला जोडलेले दसमेश हडंबा थ्रेशर (किंमत २ लाख ४६ हजार रुपये) असा एकूण ९ लाख ११ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. शेती काम करून घरासमोर दारात त्‍यांनी ट्रॅक्‍टर उभे केलेले होते. तपास पोलीस उपनिरिक्षक सूरज काळे करत आहेत.