शेगाव, उंद्री, जळगाव जामोदमधून तरुणी बेपत्ता!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव, उंद्री (ता. चिखली) व जळगाव जामोद येथून तरुणी बेपत्ता झाल्या असून, त्यांच्या हरवल्याची तक्रार त्या त्या पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलीस शोध घेत आहेत. शेगाव येथील 19 वर्षीय तरुणी जुन्या महादेव मंदिराजवळून 26 मेच्या रात्री दरम्यान बेपत्ता झाली. रामेश्वर छगन भिरडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव, उंद्री (ता. चिखली) व जळगाव जामोद येथून तरुणी बेपत्ता झाल्या असून, त्‍यांच्‍या हरवल्याची तक्रार त्‍या त्‍या पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलीस शोध घेत आहेत.

शेगाव येथील 19 वर्षीय तरुणी जुन्या महादेव मंदिराजवळून 26 मेच्या रात्री दरम्यान बेपत्ता झाली. रामेश्वर छगन भिरडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांची 19 वर्षीय मुलगी रेश्मा रात्री नऊ वाजता कुणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली. तिची उंची पाच फूट पाच इंच असून, केस काळे व लांब आहेत. अंगात हिरवा टॉप, काळी लेगिग्स, पायात काळी सॅंडल आहे. या वर्णनाची तरुणी आढळल्यास शेगाव शहर पोलीस ठाण्यातील एएसआय श्री. इंदोरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेत उंद्री येथील समरीन परवीन शेख हैदर ही 19 वर्षीय तरुणी घरात कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार तिच्या पालकांनी अमडापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. तिसऱ्या घटनेत जळगाव जामोद येथील मयुरी एकनाथ डहाके ही 21 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. ती हरवल्याची तक्रार तिच्या पालकांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात केली आहे.