शिक्षकाचे घर फोडून सोने-चांदीच्‍या दागिन्यांसह अडीच लाखांचा माल लंपास; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ४१ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना बुलडाणा शहराजवळील माळविहीर येथे २० जूनच्या सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान घडली. बुलडाणा शहर पोलिसांनी चोरट्यांविरद्ध गुन्हा दाखल केला आहे. विकास पांडुरंग बाहेकर (४८, रा. विश्वासनगर, हाजीमलंग दर्गासमोर, माळविहीर, बुलडाणा) हे करवंड (ता. चिखली) …
 
शिक्षकाचे घर फोडून सोने-चांदीच्‍या दागिन्यांसह अडीच लाखांचा माल लंपास; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्‍या दागिन्यांसह २ लाख ४१ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना बुलडाणा शहराजवळील माळविहीर येथे २० जूनच्‍या सकाळी ११ ते दुपारी २ दरम्‍यान घडली. बुलडाणा शहर पोलिसांनी चोरट्यांविरद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

विकास पांडुरंग बाहेकर (४८, रा. विश्वासनगर, हाजीमलंग दर्गासमोर, माळविहीर, बुलडाणा) हे करवंड (ता. चिखली) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. ते विश्वासनगरात पत्‍नी, दोन मुलांसह राहतात. ते काल सकाळी अकराच्‍या सुमारास मित्राच्या मुलीच्‍या साखरपुड्याच्‍या कार्यक्रमाला गाडगेनगरात गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर मुलगा विवेक घराची चावी घेऊन अभ्यासासाठी घरी आला तेव्‍हा त्‍याला मुख्य दरवाजा आतून बंद दिसला. तो घराच्‍या मागील दरवाजाकडे गेला असता दरवाजा बाहेरून बंद केलेला दिसला. दरवाजा उघडून तो आत गेला असता त्‍याला बेडरूममधील सामान अस्ताव्यस्‍त पडलेले दिसले.

दोन्‍ही कपाट सुद्धा उघडे दिसले. त्‍याने घरात चोरी झाल्‍याची माहिती वडिलांना दिली. त्‍यामुळे बाहेकर हे तातडीने घरी परतले. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले दागिने ज्‍यात सोन्याच्‍या दोन बांगड्या वजन प्रत्‍येकी २० ग्रॅम (किंमत १ लाख ६० हजार), सोन्याच्‍या दोन बाळ्या वजन ४ ग्रॅम (किंमत १६ हजार), सोन्याच्‍या कानातील दोन रिंग वजन २ ग्रॅम (किंमत ८ हजार), चांदीचे दोन वाळे (किंमत २ हजार रुपये), रोख ५५ हजार रुपये असा एकूण २ लाख ४१ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. बाहेकर यांनी बुलडाणा शहर पोलिसांना घटनेची माहिती दिल्याने पोलिसांनी पंचनामा करून चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला. तपास एपीआय जयसिंग पाटील करत आहेत.