विवाहितेचा पती घरी नसल्याने ‘तो’ घरात शिरला; जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्‍याचार! चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विवाहितेचा पती घरी नसल्याची संधी साधून घरात शिरून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 35 वर्षीय युवकाला अमडापूर पोलिसांनी अटक केली आहे. सुनील तोताराम कोल्हे(35, रा. धोडप, ता. चिखली) असे आरोपीचे नाव आहे. धोडप (ता. चिखली) येथे 27 मे रोजी रात्री ही घटना घडली.28 वर्षीय विवाहिता घरी एकटीच होती. या संधीचा फायदा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विवाहितेचा पती घरी नसल्याची संधी साधून घरात शिरून तिच्‍यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 35 वर्षीय युवकाला अमडापूर पोलिसांनी अटक केली आहे. सुनील तोताराम कोल्हे(35, रा. धोडप, ता. चिखली) असे आरोपीचे नाव आहे. धोडप (ता. चिखली) येथे 27 मे रोजी रात्री ही घटना घडली.
28 वर्षीय विवाहिता घरी एकटीच होती. या संधीचा फायदा घेत गावातीलच सुनील कोल्हे तिच्या घरात शिरला व तिच्‍यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची तक्रार पीडितेने 28 मे रोजी अमडापूर पोलीस ठाण्यात दिली. काल, 30 मे रोजी सुनीलला अमडापूर पोलिसांनी अटक केली.