विद्युत खांबावर काम करणारा कर्मचारी चिकटला!; शॉक लागून मृत्‍यू, बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विद्युत दुरुस्तीसाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना बुलडाणा शहरातील वनसंरक्षक राणी गेटसमोर आज, 17 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. योगेश श्यामराव काळे (२६, रा. सोळंके ले आऊट, बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन योगेशला खाली …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विद्युत दुरुस्‍तीसाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्‍यू झाला. ही घटना बुलडाणा शहरातील वनसंरक्षक राणी गेटसमोर आज, 17 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास घडली.

योगेश श्यामराव काळे (२६, रा. सोळंके ले आऊट, बुलडाणा) असे मृत्‍यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाच्‍या कर्मचाऱ्यांनी घटनास्‍थळी येऊन योगेशला खाली उतरले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्‍याला तातडीने हलवले. डॉक्टरांनी त्‍याला वाचविण्याचे प्रयत्‍न केले. मात्र साडेसहाच्‍या सुमारास त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉ. अमित धांडे यांनी सांगितले. तपास पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरू करत आहेत.