विजेचा धक्का लागून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू; मोताळा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विजेचा धक्का लागून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना काल, २० जुलै रोजी सायंकाळी टाकळी वाघजाळ (ता. मोताळा) येथे घडली. शुभांगी महादेव आढाव (रा. टाकळी वाघजाळ) मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. घरचे शेतात गेल्याने शुभांगी काल दुपारी घरी एकटीच होती. त्यावेळी विजेचा धक्का लागल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शुभांगी घरात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विजेचा धक्का लागून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना काल, २० जुलै रोजी सायंकाळी टाकळी वाघजाळ (ता. मोताळा) येथे घडली. शुभांगी महादेव आढाव (रा. टाकळी वाघजाळ) मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

घरचे शेतात गेल्याने शुभांगी काल दुपारी घरी एकटीच होती. त्यावेळी विजेचा धक्का लागल्‍याचे सांगण्यात आले. त्यानंतर शुभांगी घरात पडून होती. सायंकाळी तिची आई घरी आली असता ती बेशुद्धावस्थेत दिसली. नातेवाइकांनी तिला तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्‍याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची केली आहे.