लांडग्याने बकरी खाल्ली म्‍हणून शेतकऱ्याने केली आत्महत्या; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लांडग्याने बकरी मारून खाल्ल्याने शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कदमापूर (ता. खामगाव) येथे आज, 19 जुलै रोजी सकाळी 8 च्या सुमारास घडली. गोपाल तोताराम बिलेवार (५५, रा. कदमापूर ता. खामगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बिलेवार हे त्यांच्या शेतशिवारात बकऱ्या चारत असताना लांडग्याने हल्ला करीत …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लांडग्याने बकरी मारून खाल्ल्याने शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कदमापूर (ता. खामगाव) येथे आज, 19 जुलै रोजी सकाळी 8 च्या सुमारास घडली. गोपाल तोताराम बिलेवार (५५, रा. कदमापूर ता. खामगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

बिलेवार हे त्यांच्या शेतशिवारात बकऱ्या चारत असताना लांडग्याने हल्ला करीत बकरीला ठार मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे ते तणावात व आर्थिक विवंचनेत होते. या तणावतच त्यांनी आज सकाळी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खामगाव ग्रामीण पाेलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.