रेल्‍वेखाली कटून एकाचा मृत्‍यू, शेगाव तालुक्‍यातील घटना

जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेल्वेखाली येऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना कुरखेड (ता. शेगाव) शिवारात आज, १७ जुलैला सकाळी पावणेबाराच्या सुमारास समोर आली आहे. ट्रॅकमॅन अनिलकुमार कुशवाह याने कळवल्यानंतर जलंब पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंदाजे वय ५० असून, सडपातळ, रंग निमगोरा, डोके टक्कल असून, अंगात …
 
रेल्‍वेखाली कटून एकाचा मृत्‍यू, शेगाव तालुक्‍यातील घटना

जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेल्‍वेखाली येऊन एकाचा मृत्‍यू झाल्याची घटना कुरखेड (ता. शेगाव) शिवारात आज, १७ जुलैला सकाळी पावणेबाराच्‍या सुमारास समोर आली आहे. ट्रॅकमॅन अनिलकुमार कुशवाह याने कळवल्यानंतर जलंब पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. आहे. मृत्‍यू झालेल्या व्‍यक्‍तीचे अंदाजे वय ५० असून, सडपातळ, रंग निमगोरा, डोके टक्कल असून, अंगात मळकट शर्ट व निळसर काळसर पॅन्ट घातलेली आहे. त्याच्‍याजवळ एक थैली असून, त्‍यात पांढरट शर्ट त्याचे कॉलरवर शुभम टेलर शेगाव असा मार्क आहे. तपास पोलीस कर्मचारी मोबीन शाह करत आहेत. कुणाला या व्‍यक्‍तीबद्दल माहिती असल्यास मो. नं. 7020128254 वर श्री. शाह यांच्‍याशी संपर्क करावा.