रात्री उशिरापर्यंत त्‍यांचा खेळ रंगला होता, कुणीतरी पोलिसांना कळवलं, अन्‌….; मोताळा तालुक्‍यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उत्तरोत्तर रात्री त्यांचा खेळ रंगला होता… मात्र कुणीतरी पोलिसांना कळवलं… पोलीस गुपचूप आले, एकाचवेळी सर्वांना पकडले… पळायलाही कुणाला चान्स मिळाला नाही. 13 जणांना पकडून बोराखेडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कोथळी (ता. मोताळा) विद्युत उपकेंद्राच्या परिसरातील शेतात जुगार खेळला जात होता. या जुगाऱ्यांकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोहेकाँ …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः उत्तरोत्तर रात्री त्‍यांचा खेळ रंगला होता… मात्र कुणीतरी पोलिसांना कळवलं… पोलीस गुपचूप आले, एकाचवेळी सर्वांना पकडले… पळायलाही कुणाला चान्‍स मिळाला नाही. 13 जणांना पकडून बोराखेडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कोथळी (ता. मोताळा) विद्युत उपकेंद्राच्‍या परिसरातील शेतात जुगार खेळला जात होता. या जुगाऱ्यांकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

पोहेकाँ नंदकिशोर अर्जुन धांडे यांच्‍या तक्रारीवरून विनोद गोविंदा वावगे (28, रा. कोथळी), नितीन गोविंदा जोहरी (46, रा.ईब्राहिमपूर), गणेश पंढरी गणगे (29, रा.कोथळी), धोंडू ऊर्फ अजय सापुर्डा फासे (39, रा.कोथळी), विकास जयराम तायडे (23, रा.कोथळी), विलास सुधाकर बावस्कार (36, रा.कोथळी), उमेश भावसिंग माळी (33, रा. कोथळी), अंकुश गजानन राऊत (26, रा. कोथळी), तुषार भगवान भारसाकळे (30, रा. कोथळी), शेख अक्रम शेख हशम (21, रा.कोथळी), स्वप्निल राजेंद्र ठोंबरे (23,  रा.कोथळी), राहुल गजानन महाकाळ (26, रा. कोथळी), प्रविण प्रकाश मोताळकर (28, रा.कोथळी) यांच्‍या विरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

खबऱ्याने दिलेल्या माहितीच्‍या आधारे कोथळी गावाजवळ कोथळी ते मोताळा रोडवरील विदयुत उपकेंद्राच्‍या उत्तरेस नितीन जोहरी (रा.इब्राहिमपूर) याच्‍या शेतात काही लोक एक्का-बादशहा नावाचा जुगार खेळ पैशाच्‍या हारजितवर खेळत होते. पोकाँ. श्री. धामोडे,  श्री. भवटे, श्री. गोरे, श्री. बरडे यांच्‍यासह पोहकाँ श्री. धांडे यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. जुगाऱ्यांना आवाज जाणार नाही अशा पद्धतीने विदयुत उपकेंद्राजवळच मोटारसायकली लावल्या. तिथून गुपचूप पायी जाऊन पाहिले असता एका झाडाखाली लाईटच्या उजेडात जुगाराचा खेळ रंगला होता. मध्यरात्री 11.40 वाजता एकदम छापा मारून सर्वांना जागीच पकडण्यात आले. पंचासमक्ष सर्व जुगाऱ्यांची नावे विचाण्यात आली. झडतीत मोबाइल, दुचाकी, जुगाराचे साहित्‍य असा एकूण 1,59,760 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.