रात्रीतून गोठ्यातून चोरली 9 जनावरे!; चिखली तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रात्रीतून गोठ्यातून गाय, गोऱ्हा, वासरू अशी 9 जनावरे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना भोकर (ता. चिखली) शिवारात 8 जूनच्या सकाळी समोर आली आहे. गजानन सिताराम कऱ्हाडे (33, शिक्षक रा.भोकर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. भोकर शिवारात गावालगत रोडला लागून त्यांची शेती असून, शेतात टीनपत्रांचा गोठा आहे. गोठ्यात 4 म्हशी, 2 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रात्रीतून गोठ्यातून गाय, गोऱ्हा, वासरू अशी 9 जनावरे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना भोकर (ता. चिखली) शिवारात 8 जूनच्‍या सकाळी समोर आली आहे.

गजानन सिताराम कऱ्हाडे (33, शिक्षक रा.भोकर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. भोकर शिवारात गावालगत रोडला लागून त्‍यांची शेती असून, शेतात टीनपत्रांचा गोठा आहे. गोठ्यात 4 म्हशी, 2 बैल, 4 गायी, 2 वगारी, 2 गोऱ्हे, 1 वासरू, 3 रेडे असे एकूण 18 जनावरे बांधलेली होती. 8 जूनच्‍या सकाळी ते गोठ्यावर दूध काढण्यासाठी गेले असता लोखंडी गेट उघडे दिसले. एक पांढरा गोऱ्हा (किंमत अंदाजे 10,000 रुपये), एक खिल्लार जातीची गाय (किंमत अंदाजे 12,000), एक गावरान गाय व तिच्‍यासोबतचे 15 दिवसांचे वासरू लालसर व पांढरे ठिपके असलेले (दोन्ही जनावरे किंमत अंदाजे 10,000), एक काळी वगार (किंमत 10,000 रुपये) असे एकुण 42,000 रुपयांची जनावरे चोरीस गेली.

शेताशेजारील त्‍यांचे काका पुरुषोत्तम भिकाजी कऱ्हाडे यांच्‍या शेतातील गोठ्यातील सुद्धा 4 जनावरे चोरीस गेली. यात एक गावरान गाय (किंमत अंदाजे 10,000 रुपये), एक वासरू (किंमत अंदाजे 3,000 रुपये), एक गोऱ्हा (किंमत अंदाजे 15, 000 रुपये), एक गोऱ्हा (किंमत 15,000 रुपये) अशी एकूण 43,000 रुपयांची त्‍यांचीही जनावरे चोरीस गेली. या प्रकरणी गजानन कऱ्हाडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.