रस्‍त्‍यात अडवून दाम्‍पत्‍याला लुटले; दीड लाखाचे दागिने ओरबाडले!; नांदुरा शहरातील थरार

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात जाताना अडवून मारहाण करत पती- पत्नीच्या अंगावरील दीड लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना आज, ३१ जुलैला सकाळी नऊच्या सुमारास नांदुरा येथील मलकापूर रोडवरील हॉटेल सह्याद्रीजवळ घडली. ३५ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिल्यानंतर नांदुरा पोलिसांनी राजेंद्र डांगे, दिग्विजय डांगे, शिवराज डांगे, ऋषिकेश बोडदे (सर्व रा. नांदुरा), …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात जाताना अडवून मारहाण करत पती- पत्नीच्या अंगावरील दीड लाख रुपयांचे दागिने लुटल्याची घटना आज, ३१ जुलैला सकाळी नऊच्‍या सुमारास नांदुरा येथील मलकापूर रोडवरील हॉटेल सह्याद्रीजवळ घडली.

३५ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिल्यानंतर नांदुरा पोलिसांनी राजेंद्र डांगे, दिग्विजय डांगे, शिवराज डांगे, ऋषिकेश बोडदे (सर्व रा. नांदुरा), धनराज पिंगळे (रा. बुलडाणा) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. या पाच जणांनी लोखंडी रॉड महिलेच्या पतीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्‍यानंतर महिलेच्‍या गळ्यातील सोन्याची पोत (२० ग्रॅम), सोन्याची चैन (३० ग्रॅम) व दोन सोन्याच्या अंगठ्या (१० ग्रॅम) असा जवळपास दीड लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज काढून घेतला. तपास पीएसआय श्री. उमाळे करीत आहेत.