मोबाइल दुकान फोडणाऱ्या चोरट्याच्‍या एलसीबीने आवळल्‍या मुसक्‍या!; 8 मोबाइल जप्‍त, चिखलीत कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीत मोबाइल दुकान फोडून 5 मोबाइल चोरून नेणाऱ्या चोरट्याला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने आज, 8 जूनला ताब्यात घेतले. त्याला चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संघर्ष उर्फ नक्या किशोर पवार (21, रा. सिद्धार्थनगर, चिखली) असे आरोपीचे नाव आहे. पेट्रोलिंग करत असताना एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नक्या पवारला ताब्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखलीत मोबाइल दुकान फोडून 5 मोबाइल चोरून नेणाऱ्या चोरट्याला बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने आज, 8 जूनला ताब्‍यात घेतले. त्‍याला चिखली पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्यात आले आहे.

संघर्ष उर्फ नक्‍या किशोर पवार (21, रा. सिद्धार्थनगर, चिखली) असे आरोपीचे नाव आहे. पेट्रोलिंग करत असताना एलसीबीच्‍या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नक्‍या पवारला ताब्‍यात घेऊन चौकशी केली असता त्‍याने गुन्ह्याची कबुली दिली. मुद्देमाल व इतर ठिकाणांवरून चोरलेले एकूण 8 मोबाइल (किंमत 16 हजार) त्‍याच्‍याकडून जप्‍त करण्यात आले.

ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्‍या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ गजानन आहेर, पोकाँ विजय सोनोने, चालक सुधाकर बर्डे यांच्‍या पथकाने पार पाडली.