मोकाट कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला; चिखली शहरातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याने ७ वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली. ही घटना आज, २६ सप्टेंबर रोजी दुपारी अडीचला चिखली शहरातील श्रीकृष्णनगरात घडली. ईश्वरी दत्तात्रय लहाने (रा. श्रीकृष्णनगर, चिखली) असे जखमी मुलीचे नाव आहे. घराबाहेर गल्लीत खेळत असताना मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढविला. तिने आरडाओरड केल्याने शेजारच्यांनी येऊन कुत्र्यांना हाकलले. जखमी …
 
मोकाट कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला; चिखली शहरातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याने ७ वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली. ही घटना आज, २६ सप्टेंबर रोजी दुपारी अडीचला चिखली शहरातील श्रीकृष्णनगरात घडली. ईश्वरी दत्तात्रय लहाने (रा. श्रीकृष्णनगर, चिखली) असे जखमी मुलीचे नाव आहे. घराबाहेर गल्लीत खेळत असताना मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढविला. तिने आरडाओरड केल्याने शेजारच्यांनी येऊन कुत्र्यांना हाकलले. जखमी ईश्वरीला चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.