मेहकरमध्ये हॉटेल फोडले; सीसीटीव्‍ही चोरटा कैद!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहराच्या तहसील चौकातील हनुमान विजय हॉटेल फोडून चोरट्याने गल्ल्यातील सहा हजार रुपये लांबवल्याची घटना 11 जूनला सकाळी समोर आली. हॉटेल मालक हरीश मोहनदास वैष्णव (50, रा. राणाबाईनगर, मेहकर) यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 10 जूनला दुपारी 4 च्या सुमारास हॉटेल बंद करून वैष्णव घरी गेले …
 
मेहकरमध्ये हॉटेल फोडले; सीसीटीव्‍ही चोरटा कैद!

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेहकर शहराच्‍या तहसील चौकातील हनुमान विजय हॉटेल फोडून चोरट्याने गल्ल्यातील सहा हजार रुपये लांबवल्याची घटना 11 जूनला सकाळी समोर आली. हॉटेल मालक हरीश मोहनदास वैष्णव (50, रा. राणाबाईनगर, मेहकर) यांच्‍या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

10 जूनला दुपारी 4 च्‍या सुमारास हॉटेल बंद करून वैष्णव घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल उघडण्यासाठी आले असता त्‍यांना शटरचे कुलूप तुटलेले, बाजूला टॉमी पडलेली दिसली. गल्ल्यातील 6000 रुपये गायब दिसले. सीसीटीव्‍ही फूटेज तपासले असता 11 जूनच्‍या मध्यरात्री 12.30 वाजता एक व्‍यक्‍ती हॉटेलमध्ये चोरी करताना दिसून आला. त्‍याला हॉटेलवरील नोकराने ओळखले. उमेश शेळके (रा. आंबेडकरनगर, मेहकर) असे त्‍याचे नाव असल्याचे त्‍याने सांगितले. त्‍यामुळे शेळकेविरुद्ध कारवाईची मागणी तक्रारीत हॉटेलमालकाने केली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. तपास मेहकर पोलीस करत आहेत.