माहेरी राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेला ४१ वर्षीय पुरुषाने केले प्रेग्‍नंट!; गर्भपात करवला, नंतर पुण्याला गेला होता पळून…

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीने सोडल्याने माहेरी राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीसोबत प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवत प्रेग्नंट करणाऱ्या 41 वर्षीय व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात जानेफळ पोलिसांना अखेर यश आले आहे. त्याला काल, 25 जून रोजी पुण्यातून पकडून आणले. सुरेश नामदेव उमाळे (41, रा. देऊळगाव साकर्शा, ता. मेहकर) असे आरोपीचे नाव आहे. …
 

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पतीने सोडल्याने माहेरी राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीसोबत प्रेमाचे नाटक करून लग्‍नाचे आमिष दाखवत प्रेग्‍नंट करणाऱ्या 41 वर्षीय व्‍यक्‍तीच्‍या मुसक्‍या आवळण्यात जानेफळ पोलिसांना अखेर यश आले आहे. त्‍याला काल, 25 जून रोजी पुण्यातून पकडून आणले.

सुरेश नामदेव उमाळे (41, रा. देऊळगाव साकर्शा, ता. मेहकर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी देऊळगाव साकर्शा येथे दोन वर्षांपासून माहेरी राहत होती. सुरेशने तिला लग्‍नाचे आमिष दाखवून तिची इच्‍छा नसतानाही शारीरिक संबंध ठेवले. यातून तिला गर्भधारणा झाली. सुरेशने अकोला येथे नेऊन तिचा गर्भपात करवला. त्‍यानंतर मात्र तो लग्‍नास टाळाटाळ करू लागला.

फसवणूक झाल्‍याची जाणीव होताच तरुणीने जानेफळ पोलीस ठाणे गाठून सुरेशविरुद्ध तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविल्‍याचे समजताच अडीच महिन्यांपूर्वी तो पुण्याला पळून गेला होता. काल, 25 जून रोजी पुण्याला जाऊन ठाणेदार राहुल गोंदे यांनी त्‍याला पकडून आणले. तपास ठाणेदार श्री. गोंदे करत आहेत.