मलकापूरच्या सिंधी कॉलनीत पोलीस धडकताच दुकाने बंद… 3 दुकानांवर कारवाई, एका दुकानात चक्‍क गुटख्याचा साठा आढळला

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 15 जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सर्वप्रकारची दुकाने दुपारी दोनपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी आहे. असे असतानाही काल, 2 जून रोजी रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास मलकापूर शहरातील सिंधी कॉलनीतील तीन दुकाने सुरूच होती. त्यातील एका दुकानातून तर गुटखा विक्री होत होती. याच भागात एक जण मास्क न लावता …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 15 जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. त्‍यानुसार सर्वप्रकारची दुकाने दुपारी दोनपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी आहे. असे असतानाही काल, 2 जून रोजी रात्री साडेनऊ-दहाच्‍या सुमारास मलकापूर शहरातील सिंधी कॉलनीतील तीन दुकाने सुरूच होती. त्‍यातील एका दुकानातून तर गुटखा विक्री होत होती. याच भागात एक जण मास्‍क न लावता फिरताना दिसला. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरिक्षक संजीवनी पुंडगे या सरकारी पो.काँ. ईश्वर वाघ, पो.काँ. संजय पढार, पो.काँ. अनिल डागोर, पो.काँ. आसिफ शेख, पो.काँ. संतोष कुमावत यांच्‍यासह मोटारसायकलने पेट्रोलिंग करत असताना त्‍यांना सिंधी कॉलनीत अनेक दुकाने सुरू असल्याचे कळाले. त्‍यांनी तातडीने त्‍या ठिकाणी जाऊन पाहिले असता तीन दुकाने सुरू होती. त्‍यामुळे धुपेश्वर प्रोव्हिजनचा मालक शंकरकुमार सच्चुमल चालवानी (27, रा. सिंधी कॉलनी, मलकापूर), अंबिका प्रोव्हिजनचा मालक संतोष नंदलाल माधवानी (रा. सिंधी कॉलनी, मलकापूर) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. याच भागात नानकराम किसनचंद चालवानी हा त्‍याचे दुकान सुरू ठेवून ग्राहकी करत होता. पोलिसांनी तपासणी केली असता त्‍याच्‍या दुकानात चक्‍क शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळला. तो पंचासमक्ष जप्‍त करण्यात येऊन चालवानी याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला.

विनामास्क फिरताना आढळला
सिंधी कॉलनीतच राजेद्र गोविंदराम चुगवानी रा. सिंधी कॉलनी) हा विनामास्‍क फिरताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्‍याला फिरण्याचे कारण विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्‍यामुळे त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला. तपास नापोकाँ अमोल शेले करत आहेत.