“मजनू’चे अपहरण, लैलाची पोलिसांत धाव..!; पुण्याला घेऊन गेले..!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शीर्षक वाचून दचकलात ना? खरंतर घटना गंभीर आहे… कारण ३० वर्षीय विवाहितेच्या पतीचे अपहरण करून काही लोक त्याला पुण्याला घेऊन गेले आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या पत्नीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीच्या अपहरणाची तक्रार दिली. मंजू उदेभान पवार असे अपहृत पतीचे नाव असून, सौ. लैला मंजू पवार (३०, रा. …
 
“मजनू’चे अपहरण, लैलाची पोलिसांत धाव..!; पुण्याला घेऊन गेले..!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शीर्षक वाचून दचकलात ना? खरंतर घटना गंभीर आहे… कारण ३० वर्षीय विवाहितेच्या पतीचे अपहरण करून काही लोक त्‍याला पुण्याला घेऊन गेले आहेत. त्‍यामुळे हतबल झालेल्या पत्‍नीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीच्‍या अपहरणाची तक्रार दिली. मंजू उदेभान पवार असे अपहृत पतीचे नाव असून, सौ. लैला मंजू पवार (३०, रा. अंत्रज, ता. खामगाव) त्‍याला परत आणण्यासाठी पोलीस आणि वकिलांच्‍या मदतीने धडपड करत आहे. ही घटना १६ जुलैला सायंकाळी समोर आली.

लैला काल सकाळी दहाच्‍या सुमारास शेतात जात असताना पती मंजूचा तिला फोन आला. कुणीतरी लोक आपल्याला पकडून पुण्याला घेऊन जात आहेत, असे त्‍याने तिला सांगितले. त्‍यामुळे भांबावलेल्या लैलाने तातडीने हिवरखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. कदाचित पोलिसांनी पकडले असेल असे वाटून तिने तिथे विचारपूस केली. मात्र पती तिथे नसल्याचे सांगण्यात आले. नंतर तिने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. मात्र तिथेही मंजूचा पत्ता नव्हता. अखेर तिने त्यांच्‍या खामगाव येथील वकील राहुल श्यामराव थोटे यांना घडलेला प्रकार सांगितला. वकिलांनी लैलाला कॉल आलेल्या क्रमांकावर संपर्क केला असता समोरील मोबाइलधारक व्यक्तीने सांगितले, की मंजूने माझ्याकडून १२ लाख रुपयांची थैली हिसकावली आहे. ती संतोष पवारकडे दिली आहे. संतोष पळून गेल्याने आम्ही मंजूला घेऊन पुण्याला निघालो आहे. १२ लाख रुपये परत मिळाल्याशिवाय मंजूला सोडणार नाही, असे लैलाने तक्रारीत म्‍हटले आहे. या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 7972327476 या मोबाइल क्रमांकधारक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.