मच्‍छिंद्रखेडमधून मोटारसायकल लंपास!

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मच्छिंद्रखेड- तरोडी डी रोडवरून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना १० ऑगस्टच्या सकाळी आठ ते दुपारी १२ च्या दरम्यान घडली. आजवर शोध घेऊनही मोटारसायकल मिळून आली नाही. त्यामुळे अखेर काल, १९ ऑगस्टला जलंब पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. सुधाकर बळीराम भारंबे (३५, रा. मच्छिंद्रखेड, ता. शेगाव) यांनी दिलेल्या …
 
मच्‍छिंद्रखेडमधून मोटारसायकल लंपास!

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मच्‍छिंद्रखेड- तरोडी डी रोडवरून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना १० ऑगस्‍टच्‍या सकाळी आठ ते दुपारी १२ च्‍या दरम्‍यान घडली. आजवर शोध घेऊनही मोटारसायकल मिळून आली नाही. त्‍यामुळे अखेर काल, १९ ऑगस्‍टला जलंब पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

सुधाकर बळीराम भारंबे (३५, रा. मच्छिंद्रखेड, ता. शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल (क्र. एमएच 28 एजी 1940) ते शेतात घेऊन गेले होते. तरोडा डी रोडवर उभी करून ते शेतात गेले. परत आले असता मोटारसायकल जागेवर नव्‍हती. बराच शोध घेऊनही ती मिळून आली नाही. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.