भीषण अपघात : भरधाव टँकरची मालवाहू वाहनाला जबर धडक; व्‍यावसायिक जागीच ठार, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भांडे विक्रीचा व्यवसाय करून घरी परतणाऱ्या व्यावसायिकाच्या मालवाहू वाहनाला भरधाव टँकरने उडवले. यात व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खामगाव- बुलडाणा रस्त्यावरील मांडका खुटपुरी फाट्याजवळ काल, 9 मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. शांताराम मनोहर गायकवाड (54, रा. संतविहार , खामगाव) असे ठार झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भांडे विक्रीचा व्‍यवसाय करून घरी परतणाऱ्या व्‍यावसायिकाच्‍या मालवाहू वाहनाला भरधाव टँकरने उडवले. यात व्‍यावसायिकाचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना खामगाव- बुलडाणा रस्‍त्‍यावरील मांडका खुटपुरी फाट्याजवळ काल, 9 मे रोजी रात्री आठच्‍या सुमारास घडली.

शांताराम मनोहर गायकवाड (54, रा. संतविहार , खामगाव) असे ठार झालेल्या व्‍यावसायिकाचे नाव आहे. ते भांडे विक्रीचा व्यवसाय करून गोंधनापूर येथून स्वतःच्‍या मालवाहू वाहनाने (क्रमांक MH 30 AB 2089) घरी परतत होते. मांडका खुटपुरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव येणाऱ्या टँकरने (क्रमांक MH 24 AU 2688) त्‍यांना जोरदार धडक दिली. टँकरचालक धडक दिल्यानंतर तेथून पसार झाला. यात शांताराम गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला तर त्‍यांच्‍या वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तपास पोहेकाँ शेख हमीद करत आहेत.