भालगावातून 21 वर्षीय युवती, खामगावातून 45 वर्षीय घरातून निघून गेले..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन वेगवेगळ्या घटनांत 21 वर्षीय तरुणी आणि 45 वर्षीय व्यक्ती घरातून निघून गेल्याच्या तक्रारी चिखली आणि खामगावच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आज, 13 मे रोजी दाखल झाल्या आहेत. कडक लॉकडाऊन असतानाही दोघे बेपत्ता झाले, हे विशेष. चिखली तालुक्यातील भालगाव येथील अश्विनी संजय परिहार ही तरुणी घरातून निघून गेली. चिखली पोलिसांनी हरवल्याची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दोन वेगवेगळ्या घटनांत 21 वर्षीय तरुणी आणि 45 वर्षीय व्‍यक्‍ती घरातून निघून गेल्याच्‍या तक्रारी चिखली आणि खामगावच्‍या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आज, 13 मे रोजी दाखल झाल्या आहेत. कडक लॉकडाऊन असतानाही दोघे बेपत्ता झाले, हे विशेष.

चिखली तालुक्‍यातील भालगाव येथील अश्विनी संजय परिहार ही तरुणी घरातून निघून गेली. चिखली पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे. दुसऱ्या घटनेत शेख हारून शेख शरीफ (45, रा. मस्तान चौक,  खामगाव) हे घरी कुणाला काही न सांगता निघून गेले आहेत. त्यांचा नातेवाईक व आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आले नाहीत. त्‍यामुळे महंमद अशपाक महंमद इशाक यांनी आज शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.