भरधाव मोटारसायकलस्वाराने पादचारी मजुरास उडवले; जागीच ठार, चिखलीतील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने ६० वर्षीय पादचारी मजुराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चिखली- अमडापूर रोडवरील शेलूद गावाजवळील जैस्वाल मंगल कार्यालयाजवळ २६ ऑगस्टला रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. सखाराम गंगाराम राऊत (रा. शेलूद, ता. चिखली) असे ठार झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे चुलत भाचे प्रवीण प्रल्हाद घोलप (रा. माळीपुरा, चिखली) …
 
भरधाव मोटारसायकलस्वाराने पादचारी मजुरास उडवले; जागीच ठार, चिखलीतील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने ६० वर्षीय पादचारी मजुराचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना चिखली- अमडापूर रोडवरील शेलूद गावाजवळील जैस्वाल मंगल कार्यालयाजवळ २६ ऑगस्‍टला रात्री सव्वानऊच्‍या सुमारास घडली.

सखाराम गंगाराम राऊत (रा. शेलूद, ता. चिखली) असे ठार झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्‍यांचे चुलत भाचे प्रवीण प्रल्हाद घोलप (रा. माळीपुरा, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात मोटारसायकलस्वाराविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी MH 28 BJ 7523 क्रमांकाच्‍या मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सखाराम राऊत मजुरी करून चिखली येथून पायी शेलुदला परतत होते. जैस्वाल मंगल कार्यालयाजवळ त्‍यांना हिरो कंपनीची एचएफ डीलक्स मोटारसायकलने धडक दिली. त्यामुळे ते रोडवर पडले. त्यांच्‍या डोक्याला मागील बाजूस मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्‍यांना खासगी वाहनात टाकून चिखलीच्‍या जवंजाळ हाॅस्पिटलमध्ये भरती केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.