भरधाव टिप्परच्‍या धडकेने वकिलाचा मृत्‍यू; नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (प्रवीण तायडे ःबुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्परने दुचाकीला मागून ठोकरल्याने वकिलाचा मृत्यू झाला. ही घटना 29 मार्चला दुपारी 1 च्या सुमारास नांदुरा शहरातील खामगाव रोडवरील गणी पेट्रोल पंपाजवळ घडली. ॲड. भागवत श्रीकृष्ण पिवळतकर (35, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, नांदुरा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते मोटरसायकलने (MH 28 AQ 7803) घरी जात होते. …
 

नांदुरा (प्रवीण तायडे  ःबुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव टिप्‍परने दुचाकीला मागून ठोकरल्याने वकिलाचा मृत्‍यू झाला. ही घटना 29 मार्चला दुपारी 1 च्‍या सुमारास नांदुरा शहरातील खामगाव रोडवरील गणी पेट्रोल पंपाजवळ घडली.

ॲड. भागवत श्रीकृष्ण पिवळतकर (35, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, नांदुरा) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. ते मोटरसायकलने (MH 28 AQ 7803) घरी जात होते. रेल्‍वे गेट बंद असल्याने डागा मिलच्‍या समोर लोहमार्गाच्‍या खालून असलेल्या रस्‍त्‍याने जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्‍यांच्‍या दुचाकीला भरधाव टिप्परने (MH 21 X 1709) मागून धडक दिली.  ॲड. पिवळतकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात सांगितले. उपचारासाठी खामगावला नेत असताना रस्त्यातच त्‍यांचा मृत्‍यू झाला. अपघात होताच चालकाने वाहन घटनास्‍थळी सोडून पोबारा केला. सायंकाळी पोलिसांनी त्‍याचा शोध घेऊन सुनगाव येथून ताब्‍यात घेतले. या प्रकरणी ॲड. पिवळतकर यांचे सासरे पुंडलिक सोनोने यांच्‍या तक्रारीवरून टिप्परचालक रामसिंग कल्याणसिंग राजपूत याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.