भगव्‍या रूमालाने १७ वर्षीय मुलाने घरातच घेतला गळफास!; नांदुरा तालुक्‍यातील धक्‍कादायक घटना

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राहत्या घरात भगव्या रूमालाने टिनाच्या अँगलला गळफास घेऊन १७ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना अंबोडा (ता. नांदुरा) येथे काल, २५ जूनला सायंकाळी पाचला समोर आली. अमरसिंग रामसिंग चव्हाण असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो आयटीआयमध्ये शिकत होता. त्याचे आई-वडील शेती करतात. त्याला मोठा …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राहत्‍या घरात भगव्या रूमालाने टिनाच्‍या अँगलला गळफास घेऊन १७ वर्षीय मुलाने आत्‍महत्‍या केली. ही धक्‍कादायक घटना अंबोडा (ता. नांदुरा) येथे काल, २५ जूनला सायंकाळी पाचला समोर आली.

अमरसिंग रामसिंग चव्हाण असे आत्‍महत्‍या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो आयटीआयमध्ये शिकत होता. त्‍याचे आई-वडील शेती करतात. त्‍याला मोठा भाऊ असून, तोही शिकत आहे. त्‍यांची खेर्डा (ता. जळगाव जामोद) येथे दोन एकर शेती आहे. काल त्‍याचे आई-वडील पेरणीच्‍या कामासाठी खेर्डा येथे गेले होते. घरी कुणीच नसल्याचे पाहून अमरसिंगने घरातच गळफास घेतला.

संध्याकाळी आई-वडील परत आल्यानंतर ही घटना समोर आली. त्‍यांनी तातडीने त्‍याला खामगाव येथील सामान्य रुग्‍णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. तेथेच उत्तरीय तपासणी करण्यात आली. अमरसिंगचे मावसभाऊ योगेश गजानन चव्हाण (28) यांनी माहिती पोलिसांत दिल्याने पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतली. तपास एएसआय श्री. तिडके करत आहेत. आत्‍महत्‍येचे कारण घटनेच्‍या दुसऱ्या दिवशीही समोर आले नव्‍ह