बुलडाण्यात 28 वर्षीय विवाहितेचा घरात घुसून विनयभंग; आरोपीला अटक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाईट उद्देशाने उजवा हात पकडत 28 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुलडाणा शहरातील राजेश्वरनगरात घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सचिन दिनकर पारवे (30, रा. राजेश्वरनगर) याला बुलडाणा शहर पोलिसांनी आज, 27 फेब्रुवारीला दुपारी अटक केली आहे. पीडित महिला आरोपीच्या काकाच्या घरी भाड्याने राहते. काल रात्री 8:30 च्या सुमारास ती …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वाईट उद्देशाने उजवा हात पकडत 28 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुलडाणा शहरातील राजेश्वरनगरात घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सचिन दिनकर पारवे (30, रा. राजेश्वरनगर) याला बुलडाणा शहर पोलिसांनी आज, 27 फेब्रुवारीला दुपारी अटक केली आहे.

पीडित महिला आरोपीच्या काकाच्या घरी भाड्याने राहते. काल रात्री 8:30 च्या सुमारास ती घरी एकटीच होती. तेव्हा आरोपीने घरात घुसून खोली खाली करायला सांगितले. वाईट उद्देशाने उजवा हात पकडून जवळ ओढले .त्यावेळी तिने आरडाओरड करून त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. आज सकाळी याप्रकरणी पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.