बुलडाण्यात कासव तस्करांना अटक, मलकापूर रोडवर आवळल्‍या चौघांच्‍या मुसक्‍या, कासवासह साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कासवाची तस्करी करणारे चौघे काल, 2 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बुलडाणा शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. गोपनीय माहितीवरून मलकापूर रोडवरील चौधरी पेट्रोलपंपासमोर पोलिसांनी नाकेबंदी केली. संशयित कारला अडवून तपासणी केली असता त्यांच्याकडे 1 कासव मिळून आले. एकूण साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अहमदखान करीमखान …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कासवाची तस्‍करी करणारे चौघे काल, 2 जून रोजी रात्री साडेआठच्‍या सुमारास बुलडाणा शहर पोलिसांच्‍या जाळ्यात अडकले. गोपनीय माहितीवरून मलकापूर रोडवरील चौधरी पेट्रोलपंपासमोर पोलिसांनी नाकेबंदी केली. संशयित कारला अडवून तपासणी केली असता त्‍यांच्‍याकडे 1 कासव मिळून आले. एकूण साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला आहे.

अहमदखान करीमखान (31, रा. बोरखेडा ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव खांदेश), रामू मनोहर भोलवनकर (21, रा. शिवाजीनगर कुऱ्हा, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव खांदेश), रूकुमार अकबर पवार (19, रा. मादापुरी, ता. मुक्ताइनगर जि.जळगाव खांदेश), योगेश भगवान कांडेलकर (24, रा. बोदवड ता. मुक्ताईनगर जि.जळगाव खानदेश) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरिक्षक सुधाकर गवारगुरू, परिविक्षाधीन पोलीस उपनिरिक्षक श्री. बास्टेवाड, पोहेकाँ दिलीप पवार, नापोकाँ रवींद्र हजारे यांच्‍यासह अरविंद सोनोने, राजेश प्रभाकर भालेराव, जगन रतन पवार, वनपाल राहुल गुलाबराव चव्हाण यांच्या पथकाने मलकापूर रोडवरील चौधरी पेट्रोलपंपासमोर नाकेबंदी केली. साडेआठच्‍या सुमारास चिखलीहून आलेली संशयित मारोती सुझुकी इक्को कार (क्र. MH 19 CZ 5217) मलकापूरकडे जाताना दिसली.

पोलिसांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा दिला. वाहनचालकाने वाहन थांबविल्यानंतर तपासणी करण्यात आली. त्‍यांच्‍याकडे वायरच्‍या थैलीत एक कासव आढळले. त्‍याची किंमत तब्‍बल 1 लाख रुपये तरी आहे. याशिवाय चौघांचे 4 मोबाइल फोन (किंमत 50 हजार रुपये), मारोती सुझुकी कार (किंमत 5 लाख) असा एकूण साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. कासवाबाबत आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्‍यांनी हे कासव वनविभागाच्‍या जंगलातून आणल्‍याचे सांगितले. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. गवारगुरू करत आहेत.