बुलडाण्याच्‍या मच्छी ले आऊटमध्ये घरफोडी!; दागिन्यांवर डल्ला

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बंद घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला. 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असून, ही घटना बुलडाणा शहरातील मच्छी ले आऊटमध्ये काल, 6 मे रोजी सकाळी समोर आली. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौ. दुर्गा सुभाष नरोटे (25) या मुलगा-मुलीसह राहतात. त्यांचे पती …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बंद घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला. 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असून, ही घटना बुलडाणा शहरातील मच्‍छी ले आऊटमध्ये काल, 6 मे रोजी सकाळी समोर आली. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. दुर्गा सुभाष नरोटे (25) या मुलगा-मुलीसह राहतात. त्‍यांचे पती सैन्यात आहेत. 15 दिवसांपूर्वी चुलत सासरे हरिभाऊ निळुबा नरोटे मरण पाल्यामुळे त्‍या गुम्मी येथे 1 जूनला गेल्‍या होत्‍या. 5 जूनच्‍या रात्री नऊच्‍या सुमारास त्‍यांना घराशेजारी राहणाऱ्या शीतल भरत मुळवंडे यांचा फोन आला. त्यांनी त्‍यांना सांगितले की तुमच्या घराचे कुलूप तुटलेले आहे. कुणीतरी चोरी केलेली असावी. त्‍या रात्री पाऊस चालू असल्याने त्‍या दुसऱ्या दिवशी काल, 6 जूनला सकाळी बुलडाण्याला आल्या.

घराची पाहणी केली असता लाकडी कपाटाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यातील सामान बेडरुममध्ये फेकलेले दिसले. कपाटात ठेवलेले जुने सोने गहु मणी पोत वजन अंदाजे 2 तोळे (किं. 20,000), कानातील सोन्याचे झुंबर वजन अंदाजे 5 ग्रॅम (किं. अंदाजे 10,000 रुपये), सोन्याचे वेल वजन 5 ग्रॅम (किंमत 10,000), रोख 10,000 रुपये असा एकूण 50,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी 1 जून ते 5 जूनदरम्‍यान कधीतरी घर फोडून लंपास केला. तपास पोहेकाँ जाकीर शेख करत आहेत.