बुलडाणा शहरातून 19 वर्षीय, मेहकरमधून 24 वर्षीय विवाहिता गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कुणाला काही न सांगता घरातून 19 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना बुलडाणा शहरात समोर आली आहे. अशीच घटना मेहकरमध्येही घडली असून, 24 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार मेहकर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. बुलडाण्यातील शांतीनगरातून बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव अनुजा विशाल सरकटे असे आहे. 6 मे रोजी नेहमीप्रमाणे ती सकाळी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कुणाला काही न सांगता घरातून 19 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना बुलडाणा शहरात समोर आली आहे. अशीच घटना मेहकरमध्येही घडली असून, 24 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्‍याची तक्रार मेहकर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

बुलडाण्यातील शांतीनगरातून बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव अनुजा विशाल सरकटे असे आहे. 6 मे रोजी नेहमीप्रमाणे ती सकाळी घरातील कामासाठी झोपेतून उठली आणि गायब झाली. पतीने तिचा सगळीकडे शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. रंग गोरा, उंची 5 फूट 3 इंच, अंगात लाल साडी, काळी सँडल अशा वर्णनाची ही विवाहित तरुणी कुणाला आढळल्‍यास बुलडाणा शहर पोलिसांशी संपर्क करावा.

मेहकरमधून विवाहिता गायब

मेहकर येथील नागेशवाडी येथून 24 वर्षीय सीमा अर्जुन चोंडकर ही विवाहिता घरातून कुणाला काही न सांगता बेपत्ता झाली आहे. तिचाही शोध घेण्यात येत आहे.

तीन तरुण बेपत्ता
तीन तरुणही जिल्ह्यातून बेपत्ता झाल्‍याच्‍या तक्रारी पोलिसांत करण्यात आल्या आहेत. यात खामगाव शहरातील दालफैल भागातून निखिल रामदास वाकोडे (23), मलकापूरच्‍या गांधीनगरातून उज्‍ज्‍वल नीना फिरके (20), शेगावच्‍या भक्‍तीनिवासातून योगेश नंदकिशोर कडाळे (32) हे बेपत्ता झाले आहेत.