बुलडाणा ः वरवंडमध्ये फोडली मोबाइल शॉपी!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथे बसथांब्याजवळील समीर मोबाईल शॉप फोडून चोरट्याने 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या 23 हजार 272 रुपयांचा माल चोरून नेला.कादिर शाह गुलाब शाह (43, रा. वरवंड) रात्री 9 वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले असता चोरट्याने रात्रीतून दुकानाचे दोन्ही कुलूप तोडून मोबाइल व इतर सामान चोरून …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील वरवंड येथे बसथांब्याजवळील समीर मोबाईल शॉप फोडून चोरट्याने 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या 23 हजार 272 रुपयांचा माल चोरून नेला.कादिर शाह गुलाब शाह (43, रा. वरवंड) रात्री 9 वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले असता चोरट्याने रात्रीतून दुकानाचे दोन्ही कुलूप तोडून मोबाइल व इतर सामान  चोरून नेले. आज सकाळी शाह हे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन त्यांनी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. नारायण तायडे करत आहेत.