बार फोडून चोरट्यांनी लांबवल्या देशी-विदेशी दारूच्‍या बाटल्‍या; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा ते मलकापूर महामार्गावरील न्यू सूर्या बार अँड रेस्टॉरंटमधून चोरट्यांनी देशी-विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. शिवराव लक्ष्मणराव देशमुख (51, रा. मोहता प्लॉट, नांदुरा) यांनी 29 एप्रिल रोजी नांदुरा पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे, की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 5 एप्रिलपासून माझे हॉटेल …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा ते मलकापूर महामार्गावरील न्यू सूर्या बार अँड रेस्टॉरंटमधून चोरट्यांनी देशी-विदेशी दारूच्या बाटल्‍या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

शिवराव लक्ष्मणराव देशमुख (51, रा. मोहता प्लॉट, नांदुरा) यांनी 29 एप्रिल रोजी नांदुरा पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. तक्रारीत म्‍हटले आहे, की जिल्हाधिकाऱ्यांच्‍या आदेशानुसार 5 एप्रिलपासून माझे हॉटेल बंद असून, त्यावर मजूर न ठेवता स्वतः अधून मधून बघत असतो. 29 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे हॉटेलवर बघण्यासाठी गेलो असता काउंटरजवळील शोकेस फुटलेले दिसले. त्यामध्ये ठेवलेल्या दारूच्या बाटल्‍या दिसल्या नाहीत. देशीविदेशी कंपनीच्‍या दारूच्‍या बाटल्‍या एकूण 23 हजार 663रुपयांच्‍या 28 एप्रिलच्‍या रात्री 10.30 ते 29 एप्रिलच्‍या सकाळी 10 वाजेदरम्यान कुणीतरी चोरून नेल्‍या. नांदुरा पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.