बापलेकांनी एकच प्लॉट दोघांना विकला; शेगावमध्ये अटक

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकच प्लॉट दोघांना विकून खरेदीदाराची फसवणूक केल्या प्रकरणी बाप-लेकाला शहर पोलिसांनी दसऱ्याच्या दिवशी अटक केल्याने शहरातील प्रॉपर्टी डीलर्समध्ये खळबळ निर्माण झाली आहे. आरोग्य कॉलनीत राहणारे योगेश दिगंबर पुरी व दिगंबर भिकाजी पुरी या दोघांनी स्वतःच्या मालकीचे शेगाव भाग-२ सर्वे नंबर ३६८१ मधील ० हेक्टर ०५ आर जागा …
 
बापलेकांनी एकच प्लॉट दोघांना विकला; शेगावमध्ये अटक

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकच प्लॉट दोघांना विकून खरेदीदाराची फसवणूक केल्या प्रकरणी बाप-लेकाला शहर पोलिसांनी दसऱ्याच्या दिवशी अटक केल्याने शहरातील प्रॉपर्टी डीलर्समध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

आरोग्य कॉलनीत राहणारे योगेश दिगंबर पुरी व दिगंबर भिकाजी पुरी या दोघांनी स्वतःच्या मालकीचे शेगाव भाग-२ सर्वे नंबर ३६८१ मधील ० हेक्टर ०५ आर जागा मोहम्मद जमीर शेख इब्राहिम (रा. बाळापूर जि.अकोला) यांना विकली. हाच विकलेला प्लॉट २६ ऑक्टोबर २०१६ रोजी अकोला येथील मनोहरलाल अडीतमल कृपलानी (६७) यांना विक्री केला. फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर मनोहरलाल कृपलानी यांनी शेगाव पोलीस ठाण्यात १४ ऑक्‍टोबरला तक्रार दिली.

तक्रारीवरून शहर पोलिसांनी योगेश दिगंबर पुरी व दिगंबर भिकाजी पुरी या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दोघा आरोपींना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे दिगंबर भिकाजी पुरीविरुद्ध यापूर्वीसुद्धा फसवणुकीचा गुन्हा शेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. दोन्ही बाप लेकाला अटक करण्याची कारवाई ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पोलीस अंमलदार श्री. पांडे, विजय साळवे, महेंद्र नारखेडे यांनी केली. ज्या नागरिकांसोबत फसवणुकीचा प्रकार झालेला असेल त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शेगाव शहर पोलिसांनी केले आहे.