बंद घरातून येता दुर्गंध… शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले अन्‌ धक्काच बसला!; देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारच्या लोकांनी घर उघडून पाहिले असता त्यांना धक्काच बसला. घरमालकालाचा मृतदेह कुजलेला, गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना काल, १३ जुलैला डोद्रा (ता. देऊळगाव राजा) येथे सायंकाळी येथे उघडकीस आली. गजानन शिवसिंग शिंदे (३५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गजानन शिंदे गावात …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारच्या लोकांनी घर उघडून पाहिले असता त्यांना धक्काच बसला. घरमालकालाचा मृतदेह कुजलेला, गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना काल, १३ जुलैला डोद्रा (ता. देऊळगाव राजा) येथे सायंकाळी येथे उघडकीस आली. गजानन शिवसिंग शिंदे (३५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गजानन शिंदे गावात एकटेच राहत होते. त्यांचे आणि पत्नीचे आपसात पटत नसल्याने पत्नी चिखली येथे राहत होती. घरीच हाताने स्वयंपाक बनवून ते जेवायचे. पत्नी सोबत राहत नसल्याने ते नेहमी तणावात रहायचे. गावातील लोकही त्यांच्याकडे दूर्लक्ष करायचे. या तणावातच त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला असल्याची चर्चा आहे. घराकडे कुणीच फिरकले नसल्याने ही बाब लवकर उजेडात आली नाही. मात्र दुर्गंधी वाढू लागल्याने शेजारच्यांनी दरवाजा तोडून बघितले असता शिंदे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. माहिती कळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देऊळगाव महीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

बायगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या
बायगाव येथे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना काल, १३ जुलैला सायंकाळी सहाच्या सुमारास समोर आली. भास्कर सखाराम नागरे (४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भास्कर नागरे यांची पत्नी आणि मुलगा शेतातून सायंकाळी घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. भास्कर नागरे यांनी स्लॅबच्या कडीला गळफास घेतला. आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. भगाजी सखाराम नागरे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली. तपास एएसआय गजानन वाघ करत आहेत.