पोलीस ठाण्याच्‍या समोरच दोन गट भिडले!; आठ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, देऊळगाव राजा येथील घटना

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोलीस ठाण्यासमोरील भोलेशाहा बाबा दर्ग्यासमोर दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारी सुरू झाली. हाणामारीचा आवाज कानी येताच पोलीस कर्मचारी धावले. त्यामुळे काहींनी पळ काढला. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत केले. हाणामारी प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज, ११ जुलैला सकाळी अकराच्या सुमारास घडली. …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पोलीस ठाण्यासमोरील भोलेशाहा बाबा दर्ग्यासमोर दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारी सुरू झाली. हाणामारीचा आवाज कानी येताच पोलीस कर्मचारी धावले. त्‍यामुळे काहींनी पळ काढला. पोलिसांनी दोन्‍ही गटांना शांत केले. हाणामारी प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना आज, ११ जुलैला सकाळी अकराच्‍या सुमारास घडली.

पांडुरंग मुरलीधर देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, रामेश्वर देशमुख, सर्जेराव रामराव देशमुख, दामोधर नारायण दांडगे, अमोल विठ्ठल दांडगे, कब्रेज अली पठाण, सादिक अली हमीद अली पठाण (सर्व रा. मंडपगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस ठाणे जवळ असल्यामुळे हाणामारीचा आवाज ऐकून पोलीस कर्मचारी बाहेर आले असता त्यांना दोन गटांत हाणामारी सुरू असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून काहींनी तेथून पळ काढला. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील लोकांना शांत केले. पोलीस उप निरीक्षक बसवंत राज समशेटे यांनी हाणामारी करणाऱ्यांच्‍या विरोधात तक्रार दाखल केली.