नेहमी दारू पितो म्हणून भावाला चाकूने भोसकले!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नेहमी दारू पितो म्हणून दारूड्या भावानेच भावाच्या पोटात चाकू खुपसला. ही घटना ४ जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास खामगाव शहरातील माखरिया मैदान भागात घडली. गणेश अंबादास पेटकर व त्याचा भाऊ राजेश अंबादास पेटकर या दोघांनीही मद्यपान केले होते. नशेत राजेश पेटकर याने गणेशला शिविगाळ केली. तू नेहमी दारू …
 
नेहमी दारू पितो म्हणून भावाला चाकूने भोसकले!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नेहमी दारू पितो म्‍हणून दारूड्या भावानेच भावाच्‍या पोटात चाकू खुपसला. ही घटना ४ जुलैला रात्री साडेदहाच्‍या सुमारास खामगाव शहरातील माखरिया मैदान भागात घडली.

गणेश अंबादास पेटकर व त्याचा भाऊ राजेश अंबादास पेटकर या दोघांनीही मद्यपान केले होते. नशेत राजेश पेटकर याने गणेशला शिविगाळ केली. तू नेहमी दारू पितो, असे म्हणून त्याच्या पोटात चाकू भोसकला. यात गणेश गंभीर जखमी झाला. त्‍याच्‍यावर उपचार सुरू आहे. त्‍याच्यातर्फे एएसआय बळीराम वरखेडे यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी राजेशविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे करत आहेत.