निखिल लॉजच्या खोलीत रंगला होता जुगार; 16 जणांना पकडले; 90 हजारांचा मुद्देमाल जप्त; नांदुरा पोलिसांची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉजच्या बंद खोलीत दुपारी रंगलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून नांदुरा पोलिसांनी 16 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून 90 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल, 30 रोजी दुपारी 4 च्या सुमारास नांदुरा-मलकापूर रोडवरील तिरुपती टॉवर्स येथील निखिल लॉज येथे करण्यात आली. संजय यशवंत बऱ्हाटे (54, रा. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लॉजच्या बंद खोलीत दुपारी रंगलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून नांदुरा पोलिसांनी 16 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून 90 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल, 30 रोजी दुपारी 4 च्या सुमारास नांदुरा-मलकापूर रोडवरील तिरुपती टॉवर्स येथील निखिल लॉज येथे करण्यात आली.

संजय यशवंत बऱ्हाटे (54, रा. नांदुरा खुर्द), वसंता किसन पाटोळे (51, रा. शंकरनगर, पिंपळगाव राजा ता. खामगाव), गजानन प्रल्हाद गोंड (49, रा. दुर्गानगर नांदुरा), मुकिंदा जगदेव भगत (62, रा. सुजातपूर साखर कारखाना पो.स्टे. जलंब), तस्लीम खाँ मिया (45, रा. जमशेदपुरा पिंपळगाव राजा ता. खामगाव), संजय जनार्धन दामोधर (40, रा. सुजातपूर साखर कारखाना पो.स्टे. जलंब), नासीर बेग अहमद बेग (49, रा. कोळंबा, ता. नांदुरा), रवींद्र सुखदेव तेलंग (45, रा. शंकरनगर, पिंपळगाव राजा, ता. खामगाव), संजय सदाशिव देशमुख (45, रा. शिवाजी वेस खामगाव), अजगर खान अमनउल्ला खान (37, रा. शाईन कॉलनी नांदुरा), इरफान बेग अहमद बेग (46, रा. कोळंबा ता. नांदुरा), संतोष जगदेव सोनोने (44, रा. रसूलपूर), संतोष रामेश्वर बोरसे (40, रा. गणपती मंदिराजवळ वडनेर भोलजी ता. नांदुरा), गजानन त्रंबक मुऱ्हे (54, रा. दरबार गल्ली, नांदुरा), दीपक रामदास राठोड (36, रा. पेठपुरा मोहल्ला पिंपळगाव राजा ता. खामगाव), मुन्ना नारायण तायडे (52, रा. नालंदा) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. अटक करण्यात आरोपींकडून 14 मोबाइल फोनसह एकूण 90 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.