नांदुऱ्यात कृषी केंद्र फोडले!

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरातील सिनेमा रोडवरील धनंजय हार्डवेअर व कृषी केंद्र फोडून चोरट्यांनी 33 हजार रुपयांचा माल लंपास केला. ही घटना 13 जूनच्या सायंकाळी साडेसात ते 14 जूनच्या सकाळी साडेसात दरम्यान घडली आहे. अभिजित धनंजय सराफ यांचे सिनेमा रोडवर घर आणि दुकान एकाच इमारतीत आहे. ते रोज सकाळी साडेसातला दुकान उघडतात तर …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरातील सिनेमा रोडवरील धनंजय हार्डवेअर व कृषी केंद्र फोडून चोरट्यांनी 33 हजार रुपयांचा माल लंपास केला. ही घटना 13 जूनच्या सायंकाळी साडेसात ते 14 जूनच्‍या सकाळी साडेसात दरम्‍यान घडली आहे.

अभिजित धनंजय सराफ यांचे सिनेमा रोडवर घर आणि दुकान एकाच इमारतीत आहे. ते रोज सकाळी साडेसातला दुकान उघडतात तर संध्याकाळी 7 ला दुकान बंद करतात. 13 जूनला संध्याकाळी त्‍यांनी दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी नोकर शालीग्राम भुसकूटे यांच्‍यासह दुकान उघडण्यास आले असता शटरचे लॉक तोडलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. दुकानातून कॉटन बिटी बियाणाची 35 पाकिटे (किंमत 26845 रुपये), गल्ल्यातील रोख 3670 रुपये), मोबाइल (किंमत 3000 रुपये) असा एकूण 33515 रुपयांचा माल चोरीस गेल्याचे दिसून आले. त्‍यावरून नांदुरा पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. दौंड करत आहेत.