नंगी तलवार घेऊन फिरत होता, शेगावमध्ये १९ वर्षांच्‍या तरुणाला अटक

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील गणेशनगर भागात काल, १ आॅगस्टला रात्री उशिरा १९ वर्षीय तरुण नंगी तलवार घेऊन फिरत होता. ही माहिती शहर पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने त्याच्याकडे जाऊन तलवार जप्त करत त्याला ताब्यात घेतले. प्रतिक संतोष काठवडे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना माहिती मिळाली …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील गणेशनगर भागात काल, १ आॅगस्टला रात्री उशिरा १९ वर्षीय तरुण नंगी तलवार घेऊन फिरत होता. ही माहिती शहर पोलिसांना कळताच त्‍यांनी तातडीने त्‍याच्‍याकडे जाऊन तलवार जप्‍त करत त्‍याला ताब्‍यात घेतले.

प्रतिक संतोष काठवडे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना माहिती मिळाली होती की गणेशनगर परिसरातील काठोळे किराणा दुकानासमोर प्रतिक हातात तलवार घेऊन रस्त्यावर उभा आहे. ठाणेदार संतोष टाले, पोलीस उपनिरीक्षक नितीनकुमार इंगोले व सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तेथे प्रतिक तलवार घेऊन उभा दिसला. त्‍याला रात्री ११ च्‍या सुमारास ताब्‍यात घेण्यात आले. त्‍याच्‍याकडे तलवार बाळगण्याचा परवानाही नव्‍हता. पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण लक्ष्मण चांदूरकर यांच्या फिर्यादीवरून त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तपास शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीनकुमार इंगोले करत आहेत.