धक्‍कादायकच… आधी भांडत होते, पोलिसांना पाहताच भांडण सोडून पळू लागले… झडतीत त्‍यांच्‍याकडे सापडले देशी पिस्‍तूल अन्‌ धारदार चाकू!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहरातील आठवडे बाजार परिसरातून मेहकर पोलिसांनी दोन तरुणांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत १ देशी पिस्तूल व एक धारदार चाकू जप्त करण्यात आल्याने पोलीसही हैराण झाले. ही कारवाई काल, २७ जुलैला रात्री आठच्या सुमारास करण्यात आली. जेरु परात्या भोसले (२०) आणि अमोल परात्या भोसले (२२, रा. बरटाळा ता. मेहकर) अशी पकडण्यात …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहरातील आठवडे बाजार परिसरातून मेहकर पोलिसांनी दोन तरुणांना पकडले. त्‍यांच्‍या अंगझडतीत १ देशी पिस्तूल व एक धारदार चाकू जप्‍त करण्यात आल्याने पोलीसही हैराण झाले. ही कारवाई काल, २७ जुलैला रात्री आठच्‍या सुमारास करण्यात आली. जेरु परात्या भोसले (२०) आणि अमोल परात्या भोसले (२२, रा. बरटाळा ता. मेहकर) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पकडण्यात आलेले दोघेही सख्खे भाऊ आहेत, तर त्‍यांचा तिसरा साथीदार राहुल श्रीरंग पवार (२०, रा. सुकळी ता. मेहकर) फरारी झाला आहे.

काही लोक शहरात येणार असून, त्यांच्‍याजवळ शस्‍त्रे असल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी आठवडे बाजारात जाऊन पाहणी केली असता काही लोकांचे सायकलच्या पैशावरून आपसात भांडण सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहताच भांडण करणारे भांडण सोडून पळत सुटले. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून जेरू व अमोल या दोन भावांना पकडले. जेरूकडून देशी बनावटीचे पिस्तूल अंदाजे (किंमत ३० हजार) व अमोलकडून एक धारदार चाकू जप्त करण्यात आला. फरार होणाऱ्या तरुणाचे नाव श्रीरंग पवार असल्याचे पकडलेल्या दोघांनी सांगितले. तिघांविरुद्धही मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई मेहकर पोलीस स्टेशनचे पीएसआय अशोक जायभाये, नापोकाँ शेख नबी, नापोकाँ श्रीकांत गाडे, पोकाँ संजय जाधव, पोकाँ सुनील जाधव, पोकाँ गणेश लोढे यांनी केली.