दुचाकी चोरटा सीसीटीव्‍हीत कैद; लोणारमधील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मापारी गल्लीतून दुचाकी चोरीला गेली असून, या घटनेची लोणार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.संजय एकनाथ मापारी (52, रा. मापारी गल्ली, लोणार ता. लोणार) यांनी त्यांची हिरोहोंडा मोटारसायकल (क्र. MH-28-J-2005, किंमत 15 हजार रुपये) घरासमोर उभी केली होती. 17 मे रोजी दुपारी ती चोरट्याने गायब केली. मापारी यांनी शहर व …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मापारी गल्लीतून दुचाकी चोरीला गेली असून, या घटनेची लोणार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
संजय एकनाथ मापारी (52, रा. मापारी गल्ली, लोणार ता. लोणार) यांनी त्‍यांची हिरोहोंडा मोटारसायकल (क्र. MH-28-J-2005, किंमत 15 हजार रुपये) घरासमोर उभी केली होती. 17 मे रोजी दुपारी ती चोरट्याने गायब केली. मापारी यांनी शहर व परिसरात शोध घेतला मात्र दुचाकी मिळून आली नाही. शेजारील CCTV मध्ये चोरटा कैद झाला असून, तोंडाला रुमाल बांधलेला अंदाजे 20 वर्षीय, केस वाढलेला निळा पांढरा चट्ट्याचा शर्ट व जिन्स पँट घातलेला चोरटा त्‍यात दिसून येत आहे. लोणार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.