दिवसभरात 2 तरुणींसह 2 महिला बेपत्ता, एकीने चिमुकलीलाही नेले सोबत..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून बेपत्ता होण्याचे सत्र चालू महिन्यातही सुरूच आहे. आज, 6 मे रोजी तब्बल 5 जणी बेपत्ता झाल्याची तक्रार त्या त्या पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. यातील एका महिलेने घर सोडताना आपल्या 4 वर्षीय चिमुकलीलाही नेले आहे. घरातून कुणाला काही न सांगता बेपत्ता झालेल्यांत कल्याणी रामभाऊ सोळंके (18, रा. गायगाव, ता. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून बेपत्ता होण्याचे सत्र चालू महिन्यातही सुरूच आहे. आज, 6 मे रोजी तब्‍बल 5 जणी बेपत्ता झाल्‍याची तक्रार त्‍या त्‍या पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. यातील एका महिलेने घर सोडताना आपल्या 4 वर्षीय चिमुकलीलाही नेले आहे.

घरातून कुणाला काही न सांगता बेपत्ता झालेल्यांत कल्याणी रामभाऊ सोळंके (18, रा. गायगाव, ता. शेगाव), चंचल संजय चव्हाण (रा. दालफैल, खामगाव) या तरुणींसह कांचाबाई रूमालसिंह बडोले (38, रा. दाताळा ता. मलकापूर) या महिलेचा समावेश आहे, तर रेखा निवास कोलते (35, रा. रेल्‍वेस्‍टेशन परिसर, मलकापूर) ही महिला आपल्या चिमुकल्या आरती या मुलीसह घरातून निघून गेली आहे. त्‍या त्‍या पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार आज दाखल झाली असून, पोलिसांनी शोध सुरू केला आहे.