दारूड्याने ट्रक धडकवला झाडाला..; बुलडाण्याच्‍या चिखली रोडवरील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारूड्या चालकाने ट्रक झाडाला धडकवल्याने फांद्या व केबल तुटून रस्त्यावर पडली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील अडथळा दूर करत ट्रकचालकाला ताब्यात घेतले. ही घटना काल, 6 मेच्या रात्री साडेअकराच्या सुमारास चिखली रस्त्यावरील सहकार विद्यामंदिराजवळ घडली. सहायक पोलीस निरिक्षक अभिजीत अहीरराव यांच्या तक्रारीवरून ट्रकचालक संजय कचरू पवार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दारूड्या चालकाने ट्रक झाडाला धडकवल्याने फांद्या व केबल तुटून रस्‍त्‍यावर पडली. त्‍यामुळे वाहतुकीला अडथळा झाला. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन रस्‍त्‍यावरील अडथळा दूर करत ट्रकचालकाला ताब्‍यात घेतले. ही घटना काल, 6 मेच्‍या रात्री साडेअकराच्‍या सुमारास चिखली रस्‍त्‍यावरील सहकार विद्यामंदिराजवळ घडली.

सहायक पोलीस निरिक्षक अभिजीत अहीरराव यांच्‍या तक्रारीवरून ट्रकचालक संजय कचरू  पवार (46, रा. सागवन,  ता. बुलडाणा) याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक झाडाला धडकल्याची माहिती पेट्रोलिंग करताना पोलिसांना मिळाली. त्‍यामुळे श्री. अहिरराव यांनी नापोकाँ रवींद्र हजारे, चालक पोहेकाँ रमेश वाघ, होमगार्ड मंगलसिंग मोरे, जितेंद्र वानखेडे, कैलास पिठले यांच्‍यासह घटनास्‍थळी धाव घेतली. ट्रकच्‍या (क्र. MH-18-AA-7419) चालकाने त्याच्‍या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून झाडाला ठोस मारल्याने झाडाची फांदी रस्त्यावर पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला होता. तसेच केबल तुटलेल्या दिसून आल्या. ट्रक चालक संजय पवारला ताब्‍यात घेऊन मेडिकल केले असता त्‍याने मद्यार्काचे सेवन केलेले समोर आले.  त्‍यावरून त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला.